Breaking News

भाजप वाढवण्यात बाळासाहेब पाटील यांचा मोठा वाटा : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः प्रतिनिधी

बाळासाहेब पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढवण्यासाठी केलेले काम गेली अनेक वर्षे आम्ही जवळून पाहत आहोत. अनेक वेळा वेगवेगळ्या पक्षात असल्यानेे आमचे संघर्षही झाले, परंतु त्यांचे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांशी चांगले संबंध तेव्हाही होते आणि आताही आहेत. त्यांच्या प्रेमापोटी मोठ्या संख्येने त्यांचे चाहते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यातूनच त्यांचा जनसंपर्क दिसून येतो. आज ते तसेच त्यांचा मुलगा विक्रांत पाटील भाजप पक्ष वाढवण्यासाठी मोठ्या ताकदीनिशी काम करीत असल्याचे कौतुकोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोकण

म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवस समारंभात काढले.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, बाळासाहेब पाटील यांचा जनसंपर्क अफाट असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी रायगडात पक्ष वाढवण्याचे काम केले. त्यांचे काम न विसरण्याजोगे आहे. कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांनी आपला वाढदिवस साजरा करताना सामाजिक बांधिलकी जपत तळागळातील सर्वच नागरिकांना आपल्या वाढदिवसाच्या माध्यमातून फायदा होईल हा दृष्टिकोन ठेवूनच आपला वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यानिमित्ताने बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी गृहसंकुलांना कचराकुंडीचे वाटप, गरजू महिलांना साहाय्य, शेतकर्‍यांना औषध फवारणी पंपांचे वाटप, वृक्षारोपण अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील यांचा वाढदिवस खारघर येथे हजारो कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. मान्यवरांच्या उपस्थितीत या वेळी वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला.

शुभेच्छांना उत्तर देताना बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, पक्षाने माझ्या कामाची वेळोवेळी दखल घेतली. त्यांनी दिलेल्या जबाबदार्‍या मी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. जिल्ह्यात भाजपचा एकतरी आमदार असावा हे स्वप्न लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळेच साकार झाले. त्याकाळी ज्यांनी साथ दिली व आताही माझ्यासह काम करीत असलेल्या सर्वांचे मी आभार मानत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपमहापौर विक्रांत पाटील, माजी मंत्री रवी पाटील, भाजप जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देेशमुख, सभागृह नेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगरप्रमुख राकेश गोवारी, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त रसाळ, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, माजी आमदार देवेंद्र साटम, आरपीआय कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड तसेच इतर राजकीय नेते व अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply