Breaking News

पनवेलसह रायगडात ‘ड्राय रन’ यशस्वी

अलिबाग : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्रातील 30 जिल्हे व 25 महानगरपालिका क्षेत्रांत शुक्रवारी (दि. 8) कोरोना प्रतिबंधक लसीकरण सराव फेरी (ड्राय रन) यशस्वीरीत्या राबविण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात तीन आरोग्य संस्था व प्रत्येक महानगरपालिकेत एक आरोग्य संस्था या ठिकाणी ड्राय रनचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार पनवेलसह रायगड जिल्ह्यात हा पूर्वाभ्यास झाला.
देशातील 23 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांतील 736 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी ड्राय रन आयोजित करण्यात आली होती. कोविड-19 लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष लसीकरणावेळी काही समस्या येऊ नये यासाठी राज्यातही ड्राय रन घेण्यात आली. पनवेल महापालिकेनेदेखील यशस्वी ड्राय रन घेतली. शहरातील कन्या विद्यालयासमोरील आरोग्य केंद्रात ही रंगीत तालीम झाली. या वेळ महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी आरोग्य केंद्रात जाऊन ड्राय रनची पाहणी करून आढावा घेतला.
दरम्यान, देशातील दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचार्‍यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित लोकसंख्येला लस दिली जाईल. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी ड्राय रन घेण्यात येत आहेत.
लवकरच लसीकरण : आरोग्यमंत्री
चेन्नई : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी काही दिवसांमध्येच नागरिकांना कोरोनाची लस मिळू लागेल, असे म्हटले आहे. लस राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक पातळीपर्यंत पोहचावी यासाठी सरकार योजना बनवत असून, पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लस दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. लसीकरणाच्या ड्राय रनची समीक्षा करण्यासाठी दौर्‍यावर असताना ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते. भारताने अगदी कमी कालावधीत लस विकसित करून दाखवली आहे. येत्या काही दिवसांत आपण आपल्या देशवासीयांना लस देण्यास सक्षम असू, असे ते म्हणाले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply