Breaking News

पनवेलच्या ग्रामीण भागात महाविकासपर्व

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नातून 30 कोटींच्या कामांना महापालिकेची मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त, प्रतिनिधी
पनवेलच्या विकासाचा सातत्याने आलेख उंचावणारे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका हद्दीतील शहर व ग्रामीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून गावांच्या विकासाकरिता जवळपास 30 कोटी रुपयांच्या विकासकामांना शुक्रवारी (दि. 8) झालेल्या महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली. यामुळे महापालिकेत समाविष्ट 29 महसुली गावांना पायाभूत सुविधा मिळणार आहेत.
शहरांप्रमाणेच गावांचाही सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले जात आहेत. विकासाच्या दृष्टिकोनातून गावेदेखील स्मार्ट झाली पाहिजेत या अनुषंगाने परेश ठाकूर यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याला यश येत आहे. पनवेल महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. त्या सभेत  पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती अ, ब आणि डमधील गावांतील विकासकामांना मंजुरी मिळाली आहे. या सभेस उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, अतिरिक्त आयुक्त सांडभोर, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, समीर ठाकूर, हेमलता म्हात्रे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, हरेश केणी, बबन मुकादम, रामजी बेरा, माजी स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील आदी उपस्थित होते, तर इतर नगरसेवकांनी ऑनलाइन पद्धतीने या सभेत सहभाग घेतला. सभेनंतर सभागृह नेते परेश ठाकूर व इतर मान्यवरांनी पत्रकारांशी संवाद साधून पनवेल महापालिकेच्या विकासासाठी यापुढेही जास्तीत जास्त काम करण्याची ग्वाही दिली.
पनवेल महापालिकेत 23 ग्रामपंचातींमधील 29 गावांचा समावेश झाल्यानंतर या गावांचा शहराच्या धर्तीवर विकास करण्याच्या उद्देशाने सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गावांना न्याय देण्याच्या संकल्प केला. त्यानुसार त्यांनी गावोगावी जाऊन ग्रामस्थांशी बैठका, भेटीगाठी घेऊन चर्चा केली. गावांना अपेक्षित काय आहे याची चाचपणी केली. त्यानुसार या गावांना विकासकामांची भेट त्यांनी आता प्रत्यक्षात देण्यात आली आहे.
या सभेत प्रभाग अ मधील 62, प्रभाग ब मधील 24 आणि प्रभाग ड मधील सहा कामांना मंजुरी देण्यात आली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मंजूर झालेली कामे लवकर सुरू करावीत नाही तर ग्रामीण भागात पावसाळयात लोकांना त्याचा त्रास होईल असे सांगून, बांधकाम सल्लागार वेळेत काम करीत नाहीत. खारघरमध्ये काम करताना दुसरा स्लॅब पडला तरी जिन्याचे डिझाईन दिले नसल्याचे दिसून आले. अशा सल्लागारांना बदलून टाकण्याची मागणी त्यांनी केली.  

विकासात सहकार्‍यांचेही योगदान : परेश ठाकूर
महापालिकेत समाविष्ट झालेल्या 29 महसुली गावांत जिल्हा परिषदेने फारशी कामे केली नव्हती. खिडूकपाडा गावात तर मूलभूत सुविधाही आज उपलब्ध  नाहीत.  अशा गावांना पायाभूत सुविधा  देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. यामध्ये सिडको  हद्दीतील काही गावांचा ही समावेश आहे. त्या ठिकाणी सिडकोने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या नव्हत्या. ज्या वेळी सिडको कडून त्यांचा ताबा घेतला जाईला त्या वेळी हा खर्च निश्चित वसूल
केला जाईल, अशी माहिती सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिली.
शहरी पट्ट्यासोबतच ग्रामीण भागाचाही विकास झाला पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आम्हा लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मी सभागृह नेता असलो तरी या विकासकामात महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड, नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, स्थायी समितीचे आजी माजी सभापती, प्रभाग समिती सभापती, सहकारी नगरसेवक-नगरसेविक यांचे योगदान आहे, असेही परेश ठाकूर यांनी सांगितले.

महापालिका हद्दीतील सर्व परिसराचा विकास हाच उद्देश घेऊन काम सुरू आहे. शहरांप्रमाणेच गावांचाही विकास झाला पाहिजे अशी सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली आहे. त्यामुळे शहराच्या बरोबरीने गावांना मूलभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.
 -डॉ. कविता चौतमोल, महापौर

पनवेलची महापालिका व्हावी यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रयत्न केले. काही लोकं कोर्टात गेली, पण कोर्टानेही महापालिकेवर शिक्कामोर्तब केले. सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नाने आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची गंगा आली आहे. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गावांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीने काम केले. त्यामुळे आज या गावांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल पडले. 30 कोटींची कामे गावांमध्ये होणार आहेत. त्याच अनुषंगाने या वर्षात जवळपास 125 कोटी रुपयांची कामे करण्याचा मानस आमदार प्रशांत ठाकूर यांचा आहे. याकामी परेश ठाकूर यांच्यासमवेत महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त सुधाकर देशमुख व सहकार्‍यांचे अभिनंदन व आभार मानतो, अशी प्रतिक्रिया उपमहापौर जगदिश गायकवाड यांनी व्यक्त केली.
महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ’अ’ मधील रोहिंजण गावातील जगन्नाथ पाटील ते शरद पाटील यांच्या घरापर्यंत आरसीसी गटार बांधणे (रस्त्याच्या दोन्ही बाजूला) (रक्कम 35 लाख 89 हजार 460 रुपये), रोहिंजण गावातील जगन्नाथ पाटील ते शरद पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 19 लाख 56 हजार 662 रुपये), रोहींजण गावातील मुख्य रस्ता ते स्मशानभूमीपर्यंत रस्त्याचे  काँक्रीटीकरण करणे (रक्कम 15 लाख 02 हजार 036 रुपये), तुर्भे गावातील भास्कर तरे ते जनार्दन पाटील यांच्या घरापर्यंत गटार बांधणे (रक्कम 11 लाख 88 हजार 265 रुपये), तुर्भे गावातील मोतीराम पाटील ते दिनकर पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 10 लाख 43 हजार 967 रुपये), तुर्भे गावातील वसंत भोईर ते चांगा पिसर्वे यांच्या घरापर्यँत आरसीसी गटार बांधणे (रक्कम 48 लाख 94 हजार 106 रुपये), तुर्भे गावातील चंद्रकांत भोईर ते बाबुराव पाटील घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 21 लाख 54 हजार 530 रुपये), तुर्भे गावातील गजानन तरे ते संजय भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 07 लाख 77 हजार 894 रुपये), धरणा कॅम्प गावातील साईनगर ते साईमंदिर पर्यंत रस्त्याचे  काँक्रीटीकरण करणे (रक्कम 12 लाख 25 हजार 064 रुपये), धरणा कॅम्प गावातील मुख्य कमान ते उलवेकर यांच्या घरापर्यँत आरसीसी गटार बांधणे  (रक्कम 34 लाख 94 हजार 987 रुपये), धरणा कॅम्प गावातील अंतर्गत गटारे बांधणे(रक्कम 01 कोटी 34 लाख14 हजार 83 रुपये), पापडीचापाडा गावातील विश्वनाथ घरत यांच्या घरापासून ते महानगपालिका शौचालयापर्यँत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 08 लाख 12 हजार 456 रुपये),  पापडीचापाडा गावातील विश्वनाथ घरत यांच्या घरापासून ते महानगरपालिका शौचालयापर्यँत गटर बांधणे (रक्कम 24 लाख 22 हजार 866 रुपये), खुटुकबांधण येथील अंतर्गत गावातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 24 लाख 22 हजार 827 रुपये),खुटारी गावातील एकनाथ म्हात्रे ते गोवर्धन म्हात्रे यांच्या घरापर्यँत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 64 लाख 39 हजार 424 रुपये), खुटारी गावातील एनएच- 4 (कमानी पासून ) ते वासुदेव म्हात्रे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 25 लाख 54 हजार 569 रुपये), खुटारी गावातील चैतन्य मंदिर ते गणेश घाटपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 37 लाख 66 हजार 965 रुपये), एकटपाडा गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 30 लाख 68 हजार 885 रुपये),  एकटपाडा गावातील अंतर्गत गटार दुरुस्ती करणे (रक्कम 35 लाख 27 हजार 519 रुपये), पडघे गावातील अनंत भोईर ते भाऊ पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 12 लाख 61 हजार 246 रुपये),  पडघे गावातील बालूराम भोईर ते कोडु भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 25 लाख 32 हजार 841 रुपये),  पडघे गावातील नितीन भोईर ते संजय भोईर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 12 लाख 88 हजार 204 रुपये), किरवली गावातील मुख्य कमान ते पंप हाऊसपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 45 लाख 63 हजार 201 रुपये), इनामपुरी गावातील अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 22 लाख 21 हजार 804 रुपये), तोंडरे गावातील राधाकृष्ण मंदिर ते नामदेव पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 30 लाख 39 हजार 594 रुपये),  तोंडरे गावातील मुख्य रस्ता ते  राधाकृष्ण मंदिर पर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 08 लाख 76 हजार 902 रुपये),  तोंडरे गावातील नाथा भरत पाटील ते नाथा बळीराम पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 25 लाख 942 रुपये),  तोंडरे गावातील मुख्य रस्ता ते लक्ष्मण पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 13 लाख 77 हजार 523 रुपये),  तोंडरे गावातील राम मनोहर पाटील घर ते मुख्य रस्त्यापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 14 लाख 43 हजार 473 रुपये), नागझरी गावातील मुख्य रस्ता ते चाळ रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 23 लाख 35 हजार 484 रुपये), नागझरी गावातील मुख्य रस्ता ते काटेवाडी (माणिक काटे) रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 62 लाख 28 हजार 825 रुपये), कोपरा गावातील रस्ते काँक्रीटीकरण करणे (रक्कम 87 लाख 97 हजार 891 रुपये), कोपरा गावातील समाज मंदिराची डागडुजी करणे व सुशोभिकरण करणे  (रक्कम 24 लाख 75 हजार रुपये), ओवे गावातील अंतर्गत मुख्य रस्त्यालगत आरसीसी गटार बांधणे (रक्कम 95 लाख 52 हजार 731 रुपये), पेंधर येथील गोपाळ भंडारी ते हरिचंद्र निघूकर यांच्या घरापर्यंत काँक्रीट रस्ता करणे (रक्कम 07 लाख 02 हजार 467 रुपये),  पेंधर येथील विठोबा रखुमाई मंदिर ते जानू नेरुळकर यांच्या घरापर्यंत रस्ता करणे (रक्कम 06 लाख 07 हजार 754 रुपये), विठोबा रखुमाई मंदिर ते जानू नेरुळकर यांच्या घरापर्यंत गटार करणे (04 लाख 78 हजार 688 रुपये)
 पेंधर येथील जानू नेरुळकर ते गुरुनाथ पाटील यांच्या घरापर्यँत गटार बांधणे (रक्कम 04 लाख 78 हजार 688 रुपये),  पेंधर येथील विठ्ठल मंदिर ते गावदेवी मंदिरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे  (रक्कम 27 लाख 11 हजार 523 रुपये),  पेंधर येथील विठ्ठल मंदिर ते गावदेवी मंदिरापर्यंत आरसीसी गटार बांधणे (रक्कम 47 लाख 61 हजार 031 रुपये),  पेंधर येथील हरिचंद्र निघूकर ते नितीन कोपरकर यांच्या घरापर्यंत गटार बनविणे (रक्कम 04 लाख 13 हजार 463 रुपये), धरणा येथील प्रकाश कृष्णा पाटील ते श्रीपत पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम 10 लाख 19 हजार 961 रुपये),  धरणा येथील विकास केणी यांच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम 13 लाख 06 हजार 808 रुपये),  धरणा येथील गावदेवी मंदिरापासून ते राजिप शाळेपर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम 15 लाख 38 हजार 437 रुपये),  धरणा येथील काथोड मढवी ते उमेश पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम 08 लाख 36 हजार 278 रुपये),  धरणा येथील दिलीप पाटील ते नारायण मुंगा पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम 05 लाख 97 हजार 522 रुपये), राजिप शाळा धरणे येथे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 08 लाख 15 हजार 273  रुपये),  धरणा येथील हरेश पाटील ते नामदेव मढवी यांच्या घरापर्यंत गल्ली काँक्रीटीकरण करणे (रक्कम 06 लाख 09 हजार 128 रुपये),  धरणा येथील प्रकाश पाटील ते बळीराम मढवी यांच्या घरापर्यंत गटार बनविणे (रक्कम 04 लाख 53 हजार 446 रुपये), धरणा येथील कमलाकर केणी ते बाळाराम मळके यांच्या घरापर्यंत गटार बनविणे (रक्कम 11 लाख 93 हजार 896 रुपये), पेठ गाव मधील अरुण खांदेकर ते संतोष शेळके यांच्या घरापर्यँत रस्ता बनविणे (रक्कम 05 लाख 88 हजार 907 रुपये), पेठगाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 07 लाख 21 हजार 263 रुपये), पेठगाव येथील सिव्हरेज लाईन आणि गटारे एकत्र असल्याने चेंबर दुरुस्ती करणे  (रक्कम 01 लाख 68 हजार 151 रुपये), तळोजा मजकूर येथील भरत राजे ते शंकर पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे  (रक्कम 07 लाख 18 हजार 981 रुपये),  तळोजा मजकूर येथील भरत राजे ते शंकर पाटील यांच्या घरापर्यंत पाईप गटार बांधकाम करणे (रक्कम 05 लाख 42 हजार 063 रुपये),  तळोजा मजकूर येथील रामदास पाटील यांच्या घराजवळील आरसीसी गटार बांधणे (रक्कम 07 लाख 11 हजार 236 रुपये),  तळोजा मजकूर येथील रामदास पाटील यांच्या घराजवळील पाईप गटार बांधणे (रक्कम 07 लाख 11 हजार 830 रुपये), घोट गावातील राजेश गणपत पाटील ते संजय सिताराम कोळी ते मोहन निघूकर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीट करणे (रक्कम 11 लाख 68 हजार 268 रुपये),  घोट गावातील राजेश गणपत पाटील ते संजय सिताराम कोळी ते मोहन निघूकर यांच्या घरापर्यंत गटार करणे (रक्कम 09 लाख 306 रुपये), घोट गावातील बुद्ध विहार ते ज्ञानेश्वर पाटील ते आत्माराम पाटील यांच्या चाळी पर्यंत काँक्रीट करणे (रक्कम 09 लाख 82 हजार 971 रुपये), घोट गावातील बुद्ध विहार ते ज्ञानेश्वर पाटील ते आत्माराम पाटील यांच्या चाळी पर्यंत गटार करणे (रक्कम 12 लाख 341 रुपये), घोट गावातील रत्नाकर जाधव ते कृष्णा निघूकर यांच्या घरापर्यँत नवीन भुयारी गटार करणे (रक्कम 08 लाख 61 हजार 204 रुपये), धामोळे गाव येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम 11 लाख 87 लाख 443 रुपये), प्रभाग समिती ’ब’ मधील खिडूकपाडा येथील स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (रक्कम 20 लाख 85 हजार 812 रुपये), खिडूकपाडा येथील अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे (रक्कम 01 कोटी 16 लाख 62 हजार 969 रुपये), वळवली येथे समाजमंदिर बांधणे (रक्कम 61 लाख 71 हजार 307 रुपये), वळवली येथील स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (रक्कम 19 लाख 90 हजार रुपये), वळवली येथील शंकर मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 11 लाख 03 हजार 260 रुपये), वळवली येथील स्मशानभूमी ते दशरथ पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे (रक्कम 19 लाख 21 हजार 528 रुपये), वळवली येथील मारुती चिखलेकर ते मंगल भोईर ते बाळकृष्ण चिखलेकर ते गुरुनाथ चौधरी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे (रक्कम 13 लाख 84 हजार 771 रुपये), वळवली येथे हरी पेटकर ते सुभाष पाटील ते पांडुरंग भोईर ते दिनकर पालेकर ते सुनिल पालेकर ते स्वप्निल पालेकर, अरविंद पालेकर  यांच्या घरापर्यँत गल्ली काँक्रीट करणे (रक्कम 09 लाख 99 हजार 766 रुपये), टेंभोडे येथील संदिप पाटील यांच्या घरापासून ते लक्ष्मण भोईर यांच्या चाळीपर्यंत रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 12 लाख 92 हजार 817 रुपये), टेंभोडे गावामध्ये समाजमंदिर बांधणे (रक्कम 50 लाख 73 हजार 570 रुपये), टेंभोडे गावातील स्मशानभूमीमध्ये सुधारणा करणे (रक्कम 30 लाख रुपये), आसुडगाव मधील बौद्धवाडा येथे गटार बांधणे  (रक्कम 57 लाख 52 हजार 03 रुपये), आसुडगाव येथील कुणाल डेअरी ते दिनकर तांबडे घरापर्यंत रस्ता तयार करणे  (रक्कम 10 लाख 47 हजार 156 रुपये), आसुडगावमध्ये समाजमंदिर बांधणे (रक्कम 87 लाख 32 हजार 880 रुपये), आसुडगावमध्ये अंतर्गत ड्रेनेज लाईन टाकणे  (रक्कम 01 कोटी 55 लाख 09 हजार 721 रुपये), कळंबोली गावातील स्मशानभूमी मध्ये सुधारणा करणे  (रक्कम 28 लाख 26 हजार 29 रुपये), कळंबोली येथील सुनिल भगत ते संदिप भगत यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे  (रक्कम 11 लाख 79 हजार 58 रुपये),  कळंबोली येथील पाण्याच्या टाकीची सुरक्षा भिंत दुरुस्त करणे   (रक्कम 06 लाख 31 हजार 927 रुपये),  कळंबोली येथील नारायण जाधव चाळी पासून ते कातकरवाडी पर्यंत गटार बांधणे(रक्कम 03 लाख 53 हजार 235 रुपये),  कळंबोली येथील श्रीपद भगत चाळी पासून ते बैठक हॉल पर्यंत काँक्रीट रस्ता बनविणे (रक्कम 11 लाख 06 हजार 36 रुपये), प्रभाग समिती ब कार्यालयासमोरील जुनी व्यायाम शाळा तोडून त्या ठिकाणी नवीन व्यायामशाळा बांधकाम करणे (रक्कम 47 लाख 91 हजार 705 रुपये), कळंबोली येथील कातकरवाडी मधील अंतर्गत रस्ते व गटार दुरुस्ती करणे (रक्कम 21 लाख 76 हजार 962 रुपये),  कळंबोली येथील स्मशानभूमी ते शर्मा बेकरी पर्यंत रस्ता बनविणे (रक्कम 27 लाख 69 हजार 654 रुपये), रोडपाली मधील बौद्धवाडी येथील कासाडी नदीलगत दगडाचे पिचिंग करणे (रक्कम 61 लाख 310 रुपये), प्रभाग समिती ’ड’ मधील प्रभाग 20 येथील पोदी भागांमध्ये मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे (रक्कम 01 कोटी 09 लाख 31 हजार 571 रुपये),  पोदी भागांमध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे (रक्कम 01 कोटी 11 लाख 05 हजार 51 रुपये),  प्रभाग 20 मधील तक्का गाव येथे मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे (रक्कम 01 कोटी 39 लाख 54 हजार 887 रुपये), तक्का गावामध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे रक्कम 01 कोटी 38 लाख 84 हजार 288 रुपये),  प्रभाग 20 मधील काळुंद्रे येथे मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे (रक्कम 01 कोटी 04 लाख 03 हजार 136 रुपये),  प्रभाग 20 मधील भिंगारी गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गटाराचे बांधकाम करणे (रक्कम 01 कोटी 08 हजार रुपये) अशा जवळपास 30 कोटी रुपयांच्या विकासकामांना महासभेत मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

Check Also

36 घंटे @50; दीड दिवसाचे थरार नाट्य

हिंमत सिंह (सुनील दत्त), त्याचा भाऊ अजित सिंह (रणजीत) आणि या दोघांचा साथीदार दिलावर खान …

Leave a Reply