Breaking News

पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईत परिसंवाद

नवी मुंबई : विमाका

नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने पत्रकार दिनानिमित्त नवी मुंबईच्या विष्णूदास भावे नाट्यगृहात 21व्या शतकातील 21वे वर्ष: आव्हाने या परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. उपसंचालक (माहिती) कोकण विभाग डॉ. गणेश मुळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या वेळी दै. लोकसत्ताचे संपादक गिरीष कुबेर, माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी केले. कार्यक्रमात क्रियाशील प्रेस क्लब पनवेलच्या वतीने प्रेस क्लबचे संस्थापक विजय कडू व पदाधिकारी यांनी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. या वेळी सोशल डिस्टन्सिंगसह सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टसचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले.

Check Also

स्वप्नपूर्ती!

भारताने ट्वेंटी-20 विश्वचषक जिंकून आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमधील विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रोहित …

Leave a Reply