Breaking News

जेएनपीटीच्या ताफ्यात डेझी स्टार टग बोट समाविष्ट

उरण : वार्ताहर

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी)च्या ताफ्यात डेझी स्टार टग समाविष्ट झाला. जेएनपीटीचे अध्यक्ष भा.प्र.से. संजय सेठी यांनी या नवीन टगचे उद्घाटन केले. या वेळी जेएनपीटीचे उपाध्यक्ष  भा.रा.से. उन्मेष वाघ, डेजी स्टारचे कर्मचारी, पोलेस्टार मेरीटाइमची टीम, जेएनपीटीचे वरिष्ठ अधिकारी आणि भागधारक उपस्थित होते.

जेएनपीटीच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट झालेल्या या डेझी स्टार टगमुळे विविध आकारांच्या जहाजांची हाताळणी करण्यास मदत होईल व मोठ्या जहाजांची हाताळणी करताना अधिक सुरक्षा प्रदान केली जाईल. याव्यतिरिक्त जोरदार लाटा आणि तीव्र मान्सूनच्या परिस्थितीत समुद्रातील कार्य अधिक सुरक्षितरीत्या पूर्ण करण्यास मदत होईल.

अझीमुथ स्टर्न ड्राइव्ह कॉन्फिगरेशन असलेला हा डेझी स्टार टग रॉबर्ट एलेन डिझाइनवर आधारलेला असून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांसह सुसज्ज आहे. अग्निशमन कार्यासाठीसुद्धा उपयुक्त असलेला अग्नी श्रेणीमधील हा टग जेएनपीटीच्या विद्यमान प्रगत ताफ्यात समाविष्ट झाला आहे. डेझी स्टार टगमध्ये दोन निगाटा मुख्य इंजीनचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक इंजीन 1654 किलोवॅट (750 रेव्ह/मिनिटात) शक्तीसह 60 टन बोल्ट पूल आणि जवळपास 12 नॉट्स वेग प्रदान करते. या टगची रचना उच्च कार्यक्षमता लाइन आणि जहाज हाताळणी क्षमता प्रदान करण्यासाठी करण्यात आली आहे, ज्यामुळे जेएनपीटीच्या ताफ्यात वाढ झाली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply