मंदिर उद्यापासून दर्शनासाठी खुले
पनवेल : वार्ताहर
चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाचे 400 वर्षीय पुरातन असलेल्या लक्ष्मी नारायण मंदिराचा आता जीर्णोद्धार होत असून त्याच्या अध्यात्मिक रुपामुळे पनवेलची शोभा वाढविणारे देवस्थान ठरणार आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज रोडवर लक्ष्मी नारायण मंदिर असून 400 वर्षीय पुरातन असे मंदिर असल्याने त्याचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प कमिटीने केला. या वेळी त्यांनी समाजाकडून देणगी व इतरांकडून मदत घेण्याचे ठरविले, परंतु पनवेलमधील उद्योजक राजू गुप्ते यांच्या मातोश्री कांता कृष्णकांत गुप्ते यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्यामार्फत व्हावा, असे त्यांचे सुपुत्र राजू गुप्ते यांना सांगितले. राजू गुप्ते यांनी मंदिर कमिटीकडे प्रस्ताव सादर केला. त्यानुसार मंदिराचे
जीर्णोद्धार काम पूर्णत्वास आले असून रविवारी (दि. 10) या मंदिराचा वास्तुशांती होम, पुण्याह वाचन तसेच नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा व इतर धार्मिक विधी राजू गुप्ते व त्यांच्या पत्नी मुक्ता यांच्या हस्ते होणार आहेत. सायंकाळी 6 वाजेनंतर मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे.
या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी कै. राजेश राजे यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता, परंतु कोरोनाच्या काळात त्यांचे निधन झाले. त्यामुळे या मंदिराचे कमिटी सदस्य एस. एस. चितळे, गौरी राजे, गिरीश गडकरी, नितीन देशमुख आदींनी मंदिराचा जिर्णोद्धार पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष सहकार्य केले.
-राजू गुप्ते, उद्योजक