Breaking News

कामोठ्याच्या सोसायट्यांमधील पाणी समस्येबाबत अधिकार्यांना सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

कामोठे शहर सेक्टर 20 येथील वीरमा आर्केड, आइजी सोसायटी, जलाराम सोसायटी या सोसायट्यांमध्ये काही दिवसांपासून पिण्याचे पाणी दूषित येत असल्यामुळे रहिवाश्यांना उलट्या, डायरीया, डोकेदुखी अशा आजाराने ग्रासले आहे. या समस्येबाबत भाजप पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा केला. या वेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनचे व गटार दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.

सोसायट्यांमधील नागरिकांची समस्या लक्षात घेऊन स्थानिक नगरसेवक गोपीनाथ भगत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, समाजसेवक संदीप तुपे यांनी पाठपुरावा केला. त्यासंबंधी शुक्रवारी (दि. 15) पनवेल महानगरपालिका वॉर्ड ऑफिसर अरुण कोळी तथा सहाय्यक कल्पेश जळे आणि सिडको अधिकारी संकेत पाखरे यांना बोलावून नुकत्याच झालेल्या सिव्हरेज लाइन पिण्याचे पाइपलाइन, महानगर गॅस लाइन यांच्या सुरू असलेल्या कामामुळे सीवरेज लाइनमध्ये गळती झाली असून सीवरेजचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या लाइनमध्ये जात आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित येत असल्याचे आढळून आले आहे. त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांना स्थानिक नगरसेवक गोपीनाथ भगत आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि समाजसेवक संदीप तुपे यांच्या द्वारे पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्याच्या पाईप लाईनचे व गटार दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. या वेळी सर्व सोसायटीचे अध्यक्ष, सेक्रेटरी उपस्थित होते.

या तक्रारीची दखल घेऊन कामोठे शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष तेजस जाधव व सुरेंद्र हळ्ळीकर यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास लवकरात लवकर दूर करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

उरणमधील ‘उबाठा’, शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार महेश बालदी यांच्याकडून स्वागत उरण : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब …

Leave a Reply