पनवेल ः कोविडच्या पार्श्वभूमीवर 16 जानेवारी रोजी हुतात्म्यांना एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून देण्यात येणारी मानवंदना रद्द करण्यात आली आहे. उरण तालुक्यातील जासई येथील 1984 सालच्या शौर्यशाली व गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्म्यांना व प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांना अभिवादन करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत. शेतकर्यांच्या न्याय्य हक्कांकरिता 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वाखाली उरण तालुक्यातील जासई येथे प्रकल्पग्रस्तांनी तीव्र आंदोलन उभे केले होते. या शौर्यशाली लढ्यात 16 जानेवारी 1984 रोजी चिर्ले येेथील नामदेव शंकर घरत, धुतूम येथील रघुनाथ (पान 2 वर…)
अर्जुन ठाकूर हे हुतात्मे झाले, तर दुसर्या दिवशी पागोटे गावातील महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील व कमलाकर कृष्णा तांडेल हुतात्मा झाले. दरवर्षी या लढ्यात हौतात्म्य आलेल्या शेतकर्यांना अभिवादन करण्यात येते, मात्र यंदा कोविड महामारीचा विचार करून कॅडेट मानवंदना रद्द झाली आहे. मानवंदना रद्द झाली असली तरी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर सकाळी 11.30 वाजता चिर्ले, दुपारी 12 वाजता धुतूम आणि 12.30 वाजता जासई येथे उपस्थित राहणार आहेत.