Breaking News

गीतेंच्या विजयासाठी भाजप प्रयत्नशील

संजय कोनकर यांचे आवाहन; विरझोली येथे जाहीर प्रचार सभा

रोहा ः प्रतिनिधी

भाजप-सेना युती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. रोहे तालुक्यातील विरझोली हा भाग विकासापासून वंचित होता.आमच्या सरकारच्या माध्यमातून या भागात रस्ते तयार झाले. विविध योजना जनतेपर्यंत आल्या आहेत. ही विकासगंगा यापुढेही वाहत राहावी यासाठी भाजप प्रयत्नशील असून, महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर यांनी विरझोली येथे केले.

रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी विरझोली येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत कोनकर बोलत होते. केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आमदार तुकाराम सुर्वे, शिवसेना

जिल्हाप्रमुख रवी मुंढे, बाळ लोखंडे, सुजीत तांदळेकर, समीर शेडगे, अनिल नवगणे, उदय शेलार, भाजप तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे, सुलतानभाई मुकादम, उस्मान रोहेकर, सचिन फुलारे, नितीन वारंगे, संतोष खेरटकर, वसंत शेडगे, रामदास नाकती यांच्यासह ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महायुतीची ताकद मोठी आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांचा आपल्यासमोर टिकाव लागणार नाही, असा विश्वास अनंत गीते यांनी या वेळी व्यक्त केला. शेकाप कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांबरोबर न जाता महायुतीसोबत राहून येत्या निवडणुकीत धनुष्यबाणाला मतदान करण्याचे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रवी मुंढे यांनी या वेळी केले.

खोटे बोल, पण रेटून बोल असे सुनील तटकरेंचे काम आहे, तर केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या माध्यमातून भालगाव तांबडी विभागात मोठ्या प्रमाणात विकासनिधी आणला असल्याचा दावा शिवसेनेचे रोहे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी केला. या वेळी उस्मान रोहेकर, सुलतान मुकादम, रामदास नाकती आदींनी मनोगत व्यक्त केले. सभेेचे सूत्रसंचालन उदय शेलार यांनी केले.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply