Breaking News

बार्सिलोनाला नमवून अ‍ॅथलेटिक बिलबाओ अजिंक्य

स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल

सेव्हिला : वृत्तसंस्था
अ‍ॅथलेटिक बिलबाओने पिछाडीवरून मुसंडी मारत बार्सिलोनाला 3-2 असे हरवून स्पॅनिश सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले. इनाकी विलियम्स याने अतिरिक्त वेळेत केलेला गोल अ‍ॅथलेटिकच्या विजयात मोलाचा ठरला.
अँटोनी ग्रिझमन याने 40व्या मिनिटाला सामन्यातील पहिला गोल करीत बार्सिलोनाला आघाडीवर आणले, पण दोन मिनिटांनी ऑस्कर डे मार्कोस याने अ‍ॅथलेटिक बिलबाओला बरोबरी साधून दिली. ग्रिझमनने 77व्या मिनिटाला पुन्हा एकदा बार्सिलोनाची आघाडी 2-1 अशी वाढवली. बार्सिलोना 15व्या सुपर चषकावर मोहोर उमटवणार असे वाटत होते, पण 90व्या मिनिटाला अ‍ॅथलेटिकच्या एसियर विलालिब्रे याने गोल करीत 2-2 अशी बरोबरी साधली आणि सामना अतिरिक्त वेळेत नेला. अखेर विलियम्सने 93व्या मिनिटाला गोल करून अ‍ॅथलेटिकचा विजय साकारला. 120व्या मिनिटाला मेसीला पंचांनी लाल कार्ड दाखवून मैदानाबाहेर काढले.
अ‍ॅथलेटिक बिलबाओचे हे तिसरे जेतेपद ठरले. 1984मध्ये पहिल्यांदा विजयी ठरल्यानंतर 2015च्या अंतिम फेरीतसुद्धा त्यांनी मेसीच्या बार्सिलोनालाच पराभूत करून जेतेपदावर नाव कोरले होते.
मँचेस्टर सिटीचा 4-0ने विजय
जॉन स्टोन्स याने केलेल्या दोन गोलमुळे मँचेस्टर सिटीने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये क्रिस्टल पॅलेसचा 4-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह मँचेस्टर सिटीने गुणतालिकेत 35 गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले. इकाय गुंडोजन आणि सहिम स्टर्लिग यांनीही प्रत्येकी एक गोल करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड यांच्यातील लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्यामुळे लिव्हरपूलचे अग्रस्थान पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. मँचेस्टर युनायटेड 37 गुणांसह अग्रस्थानी आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply