Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त 70 सामाजिक उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा यंदा 2 जून रोजी 70 वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे हा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा केला जातो. या वर्षी श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेना व पत्रकार मित्र असोसिएशनच्या वतीने 70व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यात 70 सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये फेब्रुवारी महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी गरीब वस्तीतील लहान मुलांना युनियन हॉटेल येथे संध्याकाळी 5 ते 7दरम्यान मिसळ महोत्सव आयोजित करून वाढदिवस कार्यक्रमांना सुरुवात करण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धा, 12 फेब्रुवारीला गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, 15 फेब्रुवारीला वाहतूक पोलिसांचा सन्मान, 17 फेब्रुवारीला साई आश्रय वृद्धाश्रम सेवाभावी संस्था येथे वृद्धांना फळे व बिस्कीट वाटप, 19 फेब्रुवारीला स्नेहकुंज आधारगृह येथे ज्येष्ठांसमवेत पोवाडा कार्यक्रम, 22 फेब्रुवारीला रेल्वेस्थानक येथे भंडार्‍याच्या माध्यमातून गोरगरिबांना अन्नदान, 25 फेब्रुवारीला टॉवरवाडी येथे अन्नदान, 28 फेब्रुवारीला फणसवाडी येथे जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. याचप्रमाणे मार्च, एप्रिल, मे या महिन्यांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून माणसातील देवमाणूस रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे प्रदेश सहचिटणीस तथा पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल दीपक महाडिक यांनी केले असून, त्यांच्यासोबत पत्रकार मित्र असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप मगर, संतोष भगत, सचिव अ‍ॅड. मनोहर सचदेव, प्रमुख सल्लागार संजय नगजा, सदस्य रमणशेठ खुटले, दीपक महाडिक, ओमकार महाडिक, कैलास रक्ताटे, राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुद्रेंकर, सचिव सुरेश भोईर मेहनत घेत आहेत.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply