Breaking News

रायगडात गुढीपाडव्याचा जल्लोष

नेरळमध्ये नववर्ष स्वागत यात्रा उत्साहात

कर्जत : बातमीदार

चैत्र महिन्याचा पहिला दिवस आज नेरळ गावात हिंदू नववर्षाचे स्वागत स्वागतयात्रा काढून करण्यात आले. नेरळ नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे काढण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेत सामाजिक भान राखणारे देखील सहभागी झाले होते.पहिल्यांदा नेरळ गावातील महिला आणि तरुणी स्वागतयात्रेच्या अग्रभागी बुलेट आणि दुचाकी गाड्यांसह सामील झाले होते.

गेली 15 वर्षे नेरळ गावात नववर्ष स्वागत यात्रेच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत हे स्वागतयात्रा काढून केले जाते.तरुण मंडळी गेली अनेक वर्षे हा कार्यक्रम राबवित असून नेरळ गावातील शोभायात्रा हिंदू संस्कृतीची एकात्मता धरून ठेवणारी असल्याचे प्रतीक समजून काढली जाते.नेरळ गावातील चिंचआळी येथील श्रीगुरुदत्त मंदिरातून स्वागत यात्रेला सुरुवात झाली.माथेरान-नेरळ रस्त्याने ही स्वागत यात्रा हेटकरआळी येथील गणेश मंदिरातून पुढे चेडोबा मैदान येथून लोकमान्य टिळक वाचनालय चौकातून महेश चित्रमंदिर मार्गे चावडी नाका येथून हुतात्मा हिराजी पाटील चौकात पोहचली.तेथे महिलांनी भगव्या झेंड्यांसह नृत्य सादर केले.पुढे ही स्वागत यात्रा शिवाजी महाराज चौकात पोहचली.तेथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला यात्रा समिती तर्फे पुष्पहार घालण्यात आला.शिवाजी महाराज चौकात महाराजांची चितारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.पुढे महावीर पेठ मार्गे स्वागत यात्रा कुंभारआळी रस्त्याने संत गोरा कुंभार चौकातून शिवाजी महाराज मैदान अशी जेष्ठ नागरिक सभागृह मार्गे नेरळ ग्रामपंचायत अशी ब्राम्हण आळी मधून जुन्या बाजारपेठ भागात असलेल्या श्रीराम मंदिरात पोहचली.तेथे महाआरती झाल्यानंतर स्वागत यात्रेची सांगता झाली.

यावर्षी स्वागत यात्रेत भजन मंडळ, नेरळ परिसर वारकरी संप्रदाय, प्रजापिता ब्रम्हकुमारी मंडळ, नेरळचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, महिला मंडळ नेरळ अशा संस्थांचा आपापल्या चित्ररथासह सहभाग असणार आहे. या शोभायात्रेला ङ्गसर्वस्व वाद्य पथकाचाफ नादमय साज चढणार असून घोडे, उंट व बैलगाडी यांनी स्वागत यात्रा यांनी चांगली शोभा आणली.

वेगवेगळ्या वेशभूषा आणि पारंपारिक वेशभूषेतील महिला वर्ग यावर्षीच्या स्वागत यात्रेचे विशेष आकर्षण होत्या.त्यात पहिल्यांदा महिला भगवे झेंडे आणि भगव्या रंगाच्या साडीत बुलेट दुचाकी आणि अन्य मोटार सायकली यांच्यावर बसून स्वागत यात्रेचे नेतृत्व करीत होत्या.पारंपरिक वेशभूषेने नटलेली तरुणाई, ढोल ताशांचा गजर व वारकरी संप्रदायाच्या भक्तीत ही शोभायात्रा रंगली.नेरळ गाव भगव्या रंगाच्या झेंड्यांनी सजले होते, या स्वागत यात्रेत नेरळ गावातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नागरिक आणि विविध संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply