Breaking News

सुधागड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

16 ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य

पाली : प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.22) पालीतील भक्तनिवास येथे काढण्यात आली. त्यामध्ये तब्बल 16 ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. परिणामी जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य राहणार आहे.

रोहा उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली आणि पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, नायब तहसीलदार डी. एस. कोष्टी व वैशाली काकडे यांच्यासह राजकिय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली.

असे आहे आरक्षण

अनुसूचित जाती : माणगाव बुद्रुक

अनुसूचित जमाती खुला प्रवर्ग : चंदरगाव, हातोंड, दहिगाव, जांभुळपाडा, तिवरे व नवघर

अनुसूचित जमाती महिला : सिद्धेश्वर बुद्रुक, गोमाशी, शिलोशी, आतोणे व अडूळसे

नागरिकांचा मागासवर्ग खुला प्रवर्ग : घोटवडे ,नांदगाव, उद्धर, भार्जे व नाडसूर

नागरिकांचा मागासवर्ग महिला प्रवर्ग : महागाव, खाडपोली, आपटवणे व पाच्छापुर

सर्वसाधारण खुला प्रवर्ग : वाघोशी, खवली, चिवे, नेणवली व चिखलगाव सर्वसाधारण खुला महिला प्रवर्ग  : राबगाव, रासळ,  कुंभारशेत, नागशेत, परळी, ताडगाव व कळंब

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply