पनवेल : वार्ताहर
आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या बनावट फेसबुक अकाऊंट संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या नावाचे हुबेहुब बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे त्यांच्या फेसबुक फ्रेंड्ससोबत चॅटिंग करून गुगले पेद्वारे पैसे ट्रान्सफर करण्याची मागणी करण्यात येत आहे. असे संदेश पाठवून तोतयेगिरी करून फसवणूक करण्याचा प्रकार घडल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.