Breaking News

टीम इंडियासाठी गुड न्यूज

कोरोना चाचणीत सर्व खेळाडू निगेटिव्ह; कुटुंबाचाही लाभणार सहवास

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
कोरोनाच्या तडाख्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ घरच्या मैदानावर क्रिकेट मालिका खेळणार आहे. इंग्लंडविरूद्ध 5 फेब्रुवारीपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. तत्पूर्वीच टीम इंडियासाठी दोन चांगल्या बातम्या आल्या आहेत. तीनपैकी पहिल्या कोरोना चाचणीत सर्व भारतीय खेळाडू निगेटिव्ह आले असून त्यांना हॉटेल रूममध्ये वर्कआऊट व व्यायामाची परवानगी देण्यात आली. तसेच पहिल्या चाचणीत कोणत्याही खेळाडूत कोरोनाची लक्षणे न आढळल्याने सर्व खेळाडूंना कुटुंबाला हॉटेल रूममध्ये सोबत ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.
संघाचे तंदुरूस्ती तज्ज्ञ निक वेब आणि सोहम देसाई यांच्या देखरेखीखाली भारतीय खेळाडूंना व्यायाम व कसरत करता येणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईच्या मैदानावर खेळविण्यात येणार आहेत. त्यामुळे भारत आणि इंग्लंडचे क्रिकेटपटू चेन्नईत दाखल झाले आहेत. सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर तीन-चार दिवस सराव करून दोन्ही संघ मैदानावर उतरणार आहेत.
भारतीय संघ सध्या क्वारंटाइन असलेल्या हॉटेलमध्ये त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. एकूण तीन वेळा ही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नुकताच भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला. त्यासाठी भारतीय संघ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात होता. त्यामुळे गेली दोन-अडीच महिने भारतीय खेळाडू कुटुंबापासून दूर होते, मात्र आता खेळाडूंना कुटुंबासोबत राहण्याची परवानगी मिळाल्याने खेळाडूंच्या दृष्टीने ही चांगली बातमीच मानली जात आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply