Breaking News

पेटीएम अकाऊंटवरून फसवणूक करणार्यास बेड्या

पनवेल : वार्ताहर

माझ्या मोबाइलचा बॅलेन्स संपला आहे असे सांगून फिर्यादी यांचा मोबाइल घेऊन फिर्यादी यांचे पेटीएम अकाऊंटवरून स्वतःचे अकाऊंटवर 60 हजार रुपये ट्रान्सफर करून फसवणूक करणार्‍या आरोपीस पनवेल शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.

फिर्यादी संजय छेडीलाल रावत याचा मोबाइल आरोपी विजय राकेश सिंग (वय 25, रा. सुरतपूर गाव, जि. अलिगड, दिल्ली) याने बॅलेन्स संपला आहे असे सांगून रावत यांचा मोबाइल घेऊन पेटीएम अकाऊंटवरून स्वतःचे अकाऊंटवर 60 हजार रुपये ट्रान्सफर करून रावत यांची फसवणूक केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने सापळा तयार करून आरोपीस पुणे येथून अटक केली आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply