बडोदा : वृत्तसंस्था
दिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील तामिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या जेतेपदावर दुसर्यांदा नाव कोरले आहे. डावखुरा फिरकीपटू एम. सिद्धार्धच्या (4/20) प्रभावी गोलंदाजीला फलंदाजांचे योगदान लाभल्याने तामिळनाडूने अंतिम फेरीत बडोद्याचा सात गडी आणि 12 चेंडू राखून पराभव केला.
तामिळनाडूने यंदा 13 वर्षांनंतर प्रथमच अजिंक्यपद मिळवले. सिद्धार्थच्या फिरकीपुढे भंबेरी उडाल्याने प्रथम फलंदाजी करणार्या बडोद्याला 20 षटकांत 9 बाद 120 धावाच करता आल्या. विष्णू सोलंकीने बडोद्यासाठी सर्वाधिक 49 धावा केल्या.
प्रत्युत्तरात हरी शिशांत (35), बाबा अपराजित (नाबाद 29) आणि कर्णधार दिनेश कार्तिक (22) यांनी तामिळनाडूला विजयासमीप नेले. शाहरूख खान याने (नाबाद 18) चेंडूवर विजयी चौकार लगावला.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper