Breaking News

गतिरोधकावर मारण्यात आले पट्टे

नगरसेवक राजू सोनी यांचे प्रयत्न

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी ज्या गतिरोधकामुळे (स्पीडब्रेकर) वारंवार अपघात घडत होते, अशा ठिकाणी स्वखर्चाने पट्टे मारून वाहनचालकांना दिलासा दिला आहे.

शहरातील उरण नाका रोड एमसीबी कार्यालयाजवळ स्पीडब्रेकर आहे. तिथे नेहमीच अपघात होत होते. या संदर्भात काही नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी यांना ही बाब सांगितली असता त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन खासगी माणसे लावून संपूर्ण स्पीडब्रेकरला पट्टे मारून घेतले आहेत. त्यामुळे हे स्पीडब्रेकर वाहनचालकांना व्यवस्थित दिसत असून त्यामुळे अपघात टळू लागले आहेत. याबद्दल वाहनचालकांनी नगरसेवक राजू सोनी यांचे आभार मानले आहेत.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply