Breaking News

भाजप महिला मोर्चाचा हळदी-कुंकू समारंभ

नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र

कामोठे : रामप्रहर वृत्त
भाजप महिला मोर्चा कामोठेच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि. 4) उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील आणि पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या वेळी कामोठे येथील नवनियुक्त महिला पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.
या समारंभास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक स्मिता जाधव, पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चारुशीला घरत, सरचिटणीस मृणाल खेडेकर, उपाध्यक्ष संध्याताई, सरचिटणीस लीना पाटील, पनवेल शहर महिला अध्यक्ष वर्षा नाईक, कामोठे शहर अध्यक्षा वनिता पाटील, सरचिटणीस स्वाती केंद्रे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या महिला उपस्थित होत्या.
या वेळी महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्षपदी वनिता पाटील, सरचिटणीसपदी स्वाती केंद्रे, उपाध्यक्षपदी साधना आचार्य, रश्मी भारद्वाज, चिटणीसपदी, दिपाली तिवारी, सुरेखा लांडे, फतिमा आलम, खजिनदारपदी नंदा पाटील, सदस्यपदी सोनाली खराटमोल, लता गोडगे, प्रिया ढोकले, कलापी जाधव, माधुरी कार्लेकर, वैशाली घोपल, सुनिता शर्मा यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply