आमदार प्रशांत ठाकूर यांचे महिला पदाधिकार्यांना आवाहन
पनवेल : रामप्रहर वृत्त
पक्षाने मोठ्या विश्वासाने आपल्याकडे विविध पदांची जबाबदारी सोपवली असून, त्याचे भान ठेवत भाजपवाढीसाठी प्रयत्नशील राहा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कळंबोलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवरील नियुक्या जाहीर करण्यात आल्या. त्यासंदर्भातील नियुक्तिपत्र सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
कळंबोली शहर भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये भारतीय जनता पार्टी कळंबोली शहर महिला मोर्चा कमिटीच्या उपाध्यक्षपदी धर्मशीला विनोद झा, महिला मोर्चा कमिटीच्या उत्तर भारतीय सेल अध्यक्षपदी भागमुनी शहा, महिला मोर्चा कमिटीच्या खजिनदारपदी कमल सरगर, भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका मंडळ अंतर्गत कळंबोली शहर उपाध्यक्षपदी प्रशांत रणवरे, कामगार सेल अध्यक्षपदी जनार्दन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी तालुका उपाध्यक्ष डी. एन. मिश्रा, तालुका युवा उपाध्यक्ष जमीर शेख, शहर अध्यक्ष रविशेठ पाटील, शहर उपाध्यक्ष नितीन काळे, महिला शहर अध्यक्ष प्रियंका पवार, युवा शहर अध्यक्ष अमर ठाकूर, तालुका चिटणीस अशोक मोरे, ज्येष्ठ नेते राजेंद्र बनकर, नगरसेवक अमर पाटील, प्रकाश महानवर, केशव यादव, गगनदीप बंदेशा यांसह मान्यवर उपस्थित होते.