चेन्नई ः वृत्तसंस्था
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा 227 धावांनी दणदणीत विजय झाला. भारतातील इंग्लंडचा हा सगळ्यात मोठा विजय होता. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटचे द्विशतक आणि जलद गोलंदाज जेम्स अँडरसनच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडने हा विजय साकारला, पण आता दुसर्या कसोटीत अँडरसनला विश्रांती दिली जाऊ शकते. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक क्रिस सिल्व्हरवूड यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
अँडरसनच्या फिटनेसबाबत कोणतीही कमी नाही. 40 वर्षांचा झाल्यानंतरही खेळला तरी आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, पण भारताचा लांबलचक दौरा बघता त्याला दुसर्या कसोटीत आराम दिला जाऊ शकतो, असे सिल्व्हरवूड म्हणाले. अँडरसनने फिटनेसवर खूप मेहनत घेतली. फिट असण्यासोबतच तो उत्कृष्ट गोलंदाजीही करीत आहे. तो जोपर्यंत फिट आहे आणि जोपर्यंत खेळू इच्छितो तोपर्यंत त्याने खेळावे, असे मतही सिल्व्हरवूड यांनी व्यक्त केले आहे.
Check Also
तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!
‘वोटचोरी’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …
RamPrahar – The Panvel Daily Paper