पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने 32वे रस्ता सुरक्षा अभियान 2021 गुरुवारी (दि. 11) राबविण्यात आले. या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल उपस्थित होते. या वेळी मान्यवरांच्या हस्ते वाहनधारकांना जनजागृती विषयक कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच यमराजाच्या वेशभूषेतील कलाकारांनी वाहधारकांमध्ये जाऊन जनजागृती केली. नवीन पनवेल येथील उड्डाणपुलाजवळीस सिंग्नल येथे हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त पुरूषोत्तम कराड, वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अभिजीत मोहिते, पनवेल पोलीस स्टेशनचे लांडगे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बाल कल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती सुशिला घरत, पालिका उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, तसेच पालिकचे अधिकारी, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.