खारघर : प्रतिनिधी
पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या वतीने आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण उत्साहात झाले. स्पर्धेस दुसर्या दिवशी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे आदींनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
क्रिकेट स्पर्धेत पेण संघाने विजेतेपद पटकाविले, तर कर्जत संघ उपविजेता ठरला. उत्कृष्ट खेळाडू म्हणून डॉ. निलेश साळुंखे, सामनावीर व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक डॉ. अभिजित पाटील, उत्कृष्ट फलंदाज डॉ. प्रशांत, उत्कृष्ट गोलंदाजासाठी सचिन नाईक यांची निवड करण्यात आली. पनवेल प्रीमियर लीग स्पर्धेत पनवेल वॉरियर संघाने विजेतेपद, तर खारघर फिनिक्स संघाने उपविजेतेपद जिंकले. डॉ. सचिन मोकल मालिकावीर, डॉ. गौरव ठाकूर उत्कृष्ट फलंदाज, डॉ. निलेश पालवे उत्कृष्ट गोलंदाज ठरले. महिलांच्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेत कर्जत संघाने अव्वल क्रमांक पटकाविला. यात डॉ. ममता मेहता यांना मालिकावीर आणि डॉ. अश्विनी जगताप यांना उत्कृष्ट फलंदाज म्हणून गौरविण्यात आले. महिला डॉक्टर्ससाठी घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत डॉ. सारिका मोकल यांनी विजेतेपद आणि सोनाली जोशी यांनी उपविजेतेपद प्राप्त केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, सचिव डॉ. रवींद्र राऊत, उपाध्यक्ष डॉ. सागर चौधरी, डॉ. सागर ठाकूर, डॉ. संदेश बहादकर, डॉ. यासिन शेख, डॉ. शिरीष जोशी, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. गजेंद्र सिलीमकर, डॉ. सिद्धार्थ कौशिक, डॉ. सचिन पाटील, डॉ. सोनल सेठ, डॉ. अनघा चव्हाण आदींनी मेहनत घेतली.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper