Breaking News

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पना व पाठपुराव्यातून पनवेलमध्ये शिवसृष्टी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून, मागणीनुसार आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लोकार्पण शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला गुरुवारी (दि. 18) खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत
मोठ्या उत्साहात झाले. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केलेल्या या महत्कार्याचे या वेळी मान्यवरांसह पनवेलकरांनी कौतुक केले.
पनवेल ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्यासह कोकणाचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याची संकल्पना व मागणी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी करून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी चौकातील सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण पूर्ण झाले आहे.
या सोहळ्यास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहर अध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, अनिता पाटील, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, शहर अभियंता संजय जगताप, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, डॉ. अरुणकुमार भगत, अजय बहिरा, निलेश बाविस्कर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रूचिता लोंढे, राजेश्री वावेकर, हेमलता गोवारी, वृषाली वाघमारे, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, शशिकांत शेळके, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, अमरीश मोकल यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसराचे सुशोभीकरण संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात आले असून, 528 चौमी जागेत 100 चौमी चौथरा बांधण्यात आला आहे, तसेच मावळे, हत्ती-घोडे अशी एकूण 22 शिल्पे उभारण्यात आली आहेत. त्याचबरोबर परिसरात हिरवळ आणि विद्युत रोषणाई, तसेच शिवकालीन वेगवेगळ्या प्रसंगाच्या फ्रेम लावण्यात आल्या आहेत. यासाठी जवळपास एक कोटी 75 लाख रुपये खर्च झाला आहे. अशा या युगपुरुषाचा इतिहास तरुणांबरोबरच शिवप्रेमींना प्रेरणादायी ठरावा यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी याविषयी सभागृहात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने काम पूर्ण होऊन गुरुवारी लोकार्पण झाले. त्यामुळे आनंद व्यक्त होत आहे.  

पनवेल शहर वाढतेय. त्या अनुषंगाने नागरिकांना आवश्यक काय आहे ते देण्याचे काम महापालिकेकडून होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वेगळा आदर सर्वांच्या मनात आहे. पनवेलच्या नावलौकिकात भर घालणारा हा सुशोभीकरण प्रकल्प आहे. सुशोभीकरणाच्या माध्यमातून येथे शिवकाल, गड-किल्ले स्मरणात यावे असे काम झाले आहे. त्याबद्दल मी आमदार प्रशांत ठाकूर आणि सहकार्‍यांना धन्यवाद देतो.
-श्रीरंग बारणे, खासदार

पनवेलच्या वैभवात भर टाकणारे सुशोभीकरण झाले आहे. या ठिकाणी नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना शिवकालीन प्रचिती येणार आहे. त्यामुळे सर्वांना अभिमान वाटेल असे काम झाले आहे. पनवेलमध्ये असलेली अभिमानाची स्थाने विकसित करण्याबरोबरच पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून शहरात व ग्रामीण भागात विविध विकासकामे होत आहेत.
-प्रशांत ठाकूर, आमदार

छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सुशोभीकरण करण्याची संकल्पना व तसा प्रस्ताव सभागृह नेते परेश ठाकूर यांनी मांडण्याबरोबरच ते काम पूर्णत्वास नेण्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर  

शिवसृष्टी दर्जेदारपणे साकारली गेली पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शक सूचना केल्या. त्यानुसार काम पूर्ण झाले असून, शिवकाळ अनुभवायला मिळणार ही पनवेलकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
-परेश ठाकूर, सभागृह नेते

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply