Breaking News

महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्यात -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी
शाळा अनुदानासह इतरही मागण्यांसाठी गेल्या 40 दिवसांपासून शिक्षक संघटना मुंबईत आंदोलनाला बसल्या आहेत, पण महाविकास आघाडी सरकारच्या संवेदना बधीर झाल्या आहेत. पूर्वी आंदोलने झाली तर मंत्री, अधिकारी भेटायला यायचे. आज कुणीही भेटायला येत नाही, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते गिरीश महाजन, रणजित पाटील यांनी आझाद मैदानात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनस्थळी गुरुवारी (दि. 18) भेट दिली. त्या वेळी फडणवीस यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.
या आंदोलनास भाजपचा 100 टक्के पाठिंबा आहे. विनाअनुदानित शिक्षकांच्या अनुदानाचा प्रश्न आम्ही बैठकीत मांडणार आहोत. हा प्रश्न सोडवला नाही, तर अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा या वेळी फडणवीस यांनी दिला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply