Breaking News

चांगला विचार केला तरच जीवनात यशस्वी होऊ शकतो -शारदा निवाते

कर्जत : प्रतिनिधी

नेहमीच मोठा व चांगला विचार केला तरच आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. आपले विचार, उच्चार आणि आचारही चांगले असावेत, असे प्रतिपादन  लेखिका डॉ. शारदा निवाते यांनी येथे केले.

जीवन विद्या मिशनच्या वतीने कोरोना काळात राज्यस्तरीय निबंध, चित्रकला, काव्यलेखन, लेखन अशा 28ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात यशस्वी झालेल्या एकशेचार स्पर्धकांना नुकतेच पारितोषिके प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमात ’तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या विषयावर डॉ. शारदा निवाते बोलत होत्या. कोणतीही संधी न दवडता त्या संधीचे सोने केले पाहिजे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

डॉ. निवाते पुढे म्हणाल्या की, जीवनातील अशास्वतता घेऊन रडत बसण्यापेक्षा आपण आपले काम सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन करावे. आपल्या कार्याला परिस्थिती हा कधीच अडथळा ठरू शकत नाही.

प्राचार्य डॉ. मोहन काळे यांनी प्रास्ताविक केले. जीवन विद्या मिशनचे नारायण जगताप, कोंकण ज्ञानपीठचे सचिव प्रदीप शृंगारपुरे, साहित्यिक दिलीप गडकरी यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. यानंतर यशस्वी स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्वेता गायकवाड यांनी केले. कोंकण ज्ञानपीठचे खजिनदार झुलकरनैन डाभिया, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय मांडे, प्रा. प्रीतम जुवाटकर, प्रा. निलेश गोर्डे, निलोफर खान, रेवती देशपांडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. ज्योती लहाने यांनी आभार मानले.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply