ठाणे : येथील माजी महापौर, माजी आमदार, कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना उपनेते अनंत तरे यांचे सोमवारी (दि. 22) निधन झाले. ते 67 वर्षांचे होते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर सोमवारी सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन नातवंडे, भाऊ असा परिवार आहे. कै. अनंत तरे यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …