पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रथम राष्ट्र, नंतर संघटन आणि त्यानंतर स्वतः अशी देशहिताची विचारसरणी असलेल्या आणि त्यानुसार कार्यरत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा सोमवारी (दि. 6) स्थापना दिन होता. पनवेल भाजपच्या वतीने कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून हा स्थापना दिन साजरा करण्यात आला.
पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांनी भारतमाता, जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे जयंत पगडे यांच्या हस्ते पक्षाच्या ध्वजाचे रोहण करण्यात आले.
Check Also
पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …
RamPrahar – The Panvel Daily Paper