Breaking News

माझ्या कुटुंबाने अनेक पंतप्रधान दिले, पण मोदींना तोड नाही!

भाजप नेते वरुण गांधींचे वक्तव्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

‘माझ्या कुटुंबातील काही लोक पंतप्रधानपदी राहिले आहेत, पण जो सन्मान नरेंद्र मोदींनी देशाला मिळवून दिला आहे तो दीर्घकाळापासून कोणीही देशाला देऊ शकला नव्हता. हा माणूस केवळ देशासाठी जगत असून, देशासाठी ते आपले प्राण देतील,’ असे वक्तव्य गांधी कुटुंबीयांमधीलच एक सदस्य आणि भाजप नेते वरुण गांधी यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

सुलतानपूर मतदारसंघाचे खासदार असलेले वरुण गांधी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्याशी आतापर्यंत जितक्या वेळा भेटलो तेव्हा-तेव्हा मी त्यांच्यात एका चांगल्या नेत्याबरोबरच एक चांगला माणूस पाहिला आहे.

माझ्या जीवनात संकट आले तेव्हाही ते माझ्या पाठीशी वडिलांप्रमाणे उभे राहिले.

सुलतानपूरऐवजी पिलिभीत मतदारसंघातून निवडणूक लढवण्याविषयी गांधी म्हणाले की, जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात असता तेव्हा निर्णय तुमच्या नेतृत्वावर सोडावे लागतात. मला यंदा पिलिभीतमधून लढण्यास सांगण्यात आले. माझ्यासाठी सुलतानपूर घर आहे आणि पिलिभीतही.

पीएमला चोर म्हणणे चुकीचे

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा दिल्या जातात. त्यावर बंधू वरुण गांधी म्हणाले की, हे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या लोकप्रियतेत देशात पहिल्या क्रमांकावर आहेत. एखाद्या पंतप्रधानाला चोर म्हणणे चुकीचे आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply