Breaking News

कोरोनाचे नियम पाळणार्यांनाच बल्लाळेश्वराचे दर्शन

पाली : प्रतिनिधी

राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा गडद होऊ लागले आहे. रुग्णसंख्या वाढू लागल्याने कोरोना संदर्भातील नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यानुसार मास्क न लावणार्‍यांना अष्टविनायक  क्षेत्रापैकी पाली (ता. सुधागड) येथील श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेता येणार नसल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी बुधवारी (दि. 24) पत्रकारांना दिली.

 जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टने कोरोनाकाळात विशेष खबरदारी घेत  उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचे सर्व नियम व अटींचे पालन करणार्‍यांनाच बाप्पाचं दर्शन दिले जाणार आहे, असे     अ‍ॅड. धारप यांनी सांगितले.

मंदिर प्रवेशद्वारावर हॅण्ड सॅनिटयार वथर्मल स्कॅनिंग होत आहे.  प्रत्येक भाविकाला मास्क अनिवार्य असणार आहे. सभामंडपात प्रत्येक सहा फुटांवर गोल सर्कल करण्यात आले आहेत, त्यात बसूनच भाविक दर्शन घेत आहेत. कुठेही गर्दी होऊ नये, यासाठी ट्रस्टचे सुरक्षारक्षक तैनात आहेत. मुख्य गाभार्‍यात भाविकांना प्रवेश नाही. सभामंडपातूनच भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था केली आहे, अशी माहिती अ‍ॅड. धारप यांनी दिली.

श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात येणार्‍या भाविकांनी शासन नियमांचे पालन करून ट्रस्टला सहकार्य करावे, असे आवाहन बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय धारप यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply