Breaking News

मोहोपाड्यात कोरोना रोखण्यासाठी जनजागृती

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोरोना कहर पुन्हा राज्यात थैमान करत आसल्याचे चित्र महाराष्ट्रात नागरिकांना पाहवयास मिळत आहे. रायगड जिल्ह्यात याचे प्रमाण कमी असून ते वाढू नये याची खबारदारी घ्यावी या दृष्टीने शासन व्यवस्था पुर्णपणे खबरदारी घेत असून खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दितील मोहोपाडा बाजारपेठेतील शिवाजी चौकात कोरोना पार्श्वभूमीवर जनतेसाठी जनजागृती मोहीम आयोजित केली होती.

तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रीफल वाढवून जनजागृती मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

तहसीलदारांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राज्यात पुन्हा कोरोना संक्रमीत रुग्णांची वाढ होत आहे. तरी आपण सर्वांनी आपली स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने घालुन दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. आपल्या अवतीभवती असलेल्या कित्येक चांगल्या व जीवास जीव देणार्‍या व्यक्तींना ह्या दुष्ट कोरोनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्यातुन हिरावुन नेले आहे. त्यामुळे आपण सर्वांनीच पुर्वीपेक्षा अधिक काळजी घेऊनच सार्वजनिक जीवनात वागले पाहिजे. मला काहीच होणार नाही, मी तंदुरुस्त आहे, माझी रोग प्रतिकारशक्ती चांगली आहे अशा भ्रमात कृपया राहु नका. मानव जन्म पुन्हा नाही. स्वतःसाठी नाही निदान आपल्या कुटुंबासाठी, आपल्या चिमण्या पाखरांसाठी तरी आपली काळजी घ्यायची आहेे.

मोहीमेत वासांबे मोहोपाडा हा रविवारचा आठवडा बाजार रद्द करण्यात आला असून तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी मास्क वापरा सांगत मोहोपाडा बाजारपेठेतील नागरिकांना मास्क वाटप केले.

या वेळी रसायनी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मुल्ला, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.

Check Also

महापालिका कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संपूर्ण सहकार्य -माजी सभागृह नेते परेश ठाकूर

म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने मेळावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचा मेळावा म्युन्सिपल एम्प्लॉईज …

Leave a Reply