Breaking News

‘बीसीसीआय’ची 23 ऑक्टोबरला सार्वत्रिक निवडणूक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगातील सर्वांत श्रीमंत क्रीडा संस्थांपैकी एक अशी ओळख असलेल्या

बीसीसीआयची सार्वत्रिक निवडणूक 22 ऑक्टोबरऐवजी 23 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात होणार्‍या विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने ही निवडणूक एका दिवसाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र व हरियाणा राज्यांत 21 ऑक्टोबरला मतदान, तर 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. बीसीसीआयने आपल्या निवडणुकांचा कार्यक्रम आधीच जाहीर केला होता, मात्र विधानसभा निवडणुकांमुळे या निवडणुका आता 22ऐवजी 23 ऑक्टोबरला होणार आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply