खोपोली : प्रतिनिधी
ब्रेक निकामी झाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरून भरधाव वेगाने चाललेला ट्रक बुधवारी (दि. 3) पहाटे अज्ञात वाहनाला जाऊन धडकला. व त्यानंतर महामार्गाच्या रेलींगला घासत 125 मीटर पुढे गेला. या अपघातात वाहनचालक बचावला असला तरी ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसल्यामुळे मुंबई -पुणे महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. जागोजागी वेगमर्यादेचे फलक लावलेले असूनही वाहनचालक नियम पालन करत नसल्याचे दिसून येत आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली एक्झीटजवळ मुंबईकडे भरधाव वेगात चाललेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे अज्ञात वाहनाला धडक देवून ट्रक रेलींगला घासत पुढे गेला. या अपघाताचे वृत्त समजताच डेल्टा फोर्स, महामार्ग पोलीस कर्मचार्यांनी व अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी टीमने घटनास्थळी जावून वाहतूक सुरळीत केली.