Breaking News

महडमध्ये लग्नाचे प्रलोभन दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पीडिता गर्भवती; आरोपीला अटक

खोपोली : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीला लग्नाचे प्रलोभन दाखवत शरीरसंबंध ठेवून तिला गरोदर ठेवणार्‍या आकाश पाटील (रा. चिंचवली गोहे, ता. खालापूर) याच्या विरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी आकाशला अटक केली आहे.

महड येथे राहणार्‍या अल्पवयीन मुलीला आकाशने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाचे खोटे प्रलोभन दाखवले होते. मुलीच्या इच्छेविरुद्ध आकाशने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यासंबधातून पीडित मुलगी गरोदर राहिली. याबाबत पीडित मुलीच्या घरात कुणकुण लागल्यानंतर त्यांनी खालापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. व आकाश पाटील विरोधात तक्रार दिली.  सदर गुन्ह्यातील आरोपी  आकाश पाटीलला खालापूर पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात आकाश विरोधात भादंवि कलम 376,376(2)(एन)(आय), 376(3),बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोस्को)अधिनियम 2012चे कलम 4,8,12प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक  एस काळे करीत आहेत.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply