Breaking News

मतदान यंत्रात बिघाड झाला तर…

झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन हजर होणार

पेण : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एखाद्या मतदान यंत्रात बिघाड झाला तर कोणतेही टेन्शन असणार नाही. तांत्रिक बिघाडानंतर अवघ्या दहा मिनिटांतच संबंधित विभागाचा झोनल अधिकारी नवे मशीन घेऊन मतदान केंद्रावर हजर होणार असल्यामुळे मतदारांची रखडपट्टी थांबणार आहे.

देशभरात आता मतदानासाठी कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट अशा तीन मशीनचा वापर केला जाणार आहे. तांत्रिक बिघाडामुळे या मशीन बंद पडल्यास निवडणूक कर्मचार्‍यांचा गोंधळ उडतो. निवडणूक आयोगाने एखाद्या मतदान केंद्रातील मशीन बंद पडल्यास अवघ्या दहा मिनिटांत नवीन मशीन पोहचवण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी प्रत्येक 10 मतदान केंद्रांमागे एक झोनल अधिकारी असणार आहे. एका लोकसभा मतदारसंघात गरजेनुसार सुमारे 250-300 झोनल अधिकारी असून, त्यांच्याकडे अतिरिक्त कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हिव्हिपॅट मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांक संबंधित निवडणूक कर्मचार्‍याला उपलब्ध करून दिले आहेत. मशीनमध्ये बिघाड झाल्यास कर्मचार्‍यांनी गोंधळून न जाता किंवा कोणाच्याही दबावाखाली न येता झोनल अधिकार्‍याला फोन करावा, ते पुढील दहा मिनिटांत नवीन मशीन उपलब्ध करून देतील.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply