Breaking News

नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून विविध विकासकामे

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून अनेक विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार नवीन पनवेल पोदी क्रमांक 3 येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच सेक्टर 16मधील उद्यानात पाणपोई बसविण्यात आली. या विकासकामांचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 12) करण्यात आला.
पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका चारुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल पोदी क्रमांक 3 येथील हनुमान मंदिर येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच त्यांच्या सेक्टर 16 येथील उद्यानात पाणपोई बांधण्यात आली आहे. या पाणपोईचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर, तर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात झाले.    
या वेळी पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, सदस्य भूपेंद्र पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ‘ड’ सभापती सुशीला घरत, प्रभाग समिती ‘ब’ सभापती समीर ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, भाजप नेते रवी नाईक, कमलाकर घरत, किशोर मोरे, जयराम मुंबईकर, प्रभा सिन्हा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply