Breaking News

सुनील तटकरेंचा पराभव अटळ : ना. अनंत गीते

पोलादपूर : प्रतिनिधी

आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे हे शेकाप आणि काँग्रेसच्या नेत्यांना सोबत घेऊन फिरत आहेत, मात्र या पक्षांचे कार्यकर्ते माझ्या विजयासाठी कामाला लागले असून, मतदारांचा कौलही मलाच असल्याने तटकरेंचा दुसर्‍यांदा पराभव अटळ असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार ना. अनंत गीते यांनी केला आहे. ते पोलादपूर येथील जाहीर सभेत बोलत होेते.

शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांच्या महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांची सभा पोलादपूर येथील शिवाजीनगर बीएसएनएल ग्राऊंडवर झाली.

या वेळी आमदार भरत गोगावले यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी शिवसेनेचा हा अभेद्य किल्ला कायम राखावा, असे आवाहन केले. शिवसेना तालुकाप्रमुख निलेश अहिरे, भाजपचे कार्यकारिणी सदस्य मनोज भागवत, जिल्हा उपाध्यक्ष राजेय भोसले यांचीही भाषणे झाली.

या सभेस दक्षिण रायगड युवासेना अधिकारी विकास गोगावले, विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार, शिवसेना शहरप्रमुख सुरेश पवार, उपशहरप्रमुख राजन पाटणकर, महिला जिल्हा संघटक वैशाली भुतकर, तालुका अध्यक्षा अश्विनी गांधी, माजी उपसरपंच मंगेश नगरकर, जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, नगराध्यक्ष निलेश सुतार आदी उपस्थित होते.

‘आघाडी नव्हे; ही तर लाडीगोडी’

या वेळी आपल्या भाषणात आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, काँग्रेसला राष्ट्रवादीने विचारात घेतले नाही, तर शेकापला मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात उमेदवारी लढवणे कठीण होऊन बसल्याने ते पाठिंबा देण्याखेरिज काहीही करू शकत नाही. त्यामुळे ही आघाडी नव्हे; तर संधीसाधूंची लाडीगोडी असल्याचे शरसंधानही त्यांनी साधले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply