पेण : प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी (दि. 17) पेणमध्ये येत असून, यानिमित्त आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शेतकर्यांशी संवाद, नुकसानभरपाई, गणपती कारखानदारांचे प्रश्न, पीओपीवरील बंदी, ग्रामीण रस्ते या विषयांवर चर्चा होणार आहे. या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, भाजपचे पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.