Breaking News

शरद पवार अनिल देशमुखांवर नाराज?

गृहमंत्रीपद जाण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके आढळल्याचे प्रकरण ज्या पद्धतीने अनिल देशमुख यांनी हाताळले आहे, त्यावरून पवार हे देशमुख यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे मुंबईचे पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांच्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेही गृहमंत्री पद जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शुक्रवारी (दि. 19) देशमुख यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतली. यावरून देशमुख यांचेही गृहमंत्री पद जाऊ शकते, अशी चर्चा होत आहे.

शरद पवार यांनी मागील काही दिवसात राज्यातील काही आयपीएस अधिकार्‍यांशीदेखील चर्चा केली आहेत. त्यांनी गृह विभागाच्या कामकाजाविषयी माहिती घेतल्याचेदेखील सूत्रांकडून कळले आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्पोटके सापडल्याच्या प्रकरणाच्या तपासावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर नाराज असल्याचे सांगितले जात होते. दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शरद पवार यांच्यामध्ये सुमारे तासभर खलबते सुरू होती. मुंबईच्या सध्याच्या घडामोडीवरही चर्चा झाल्याचे अनिल देशमुखांनी सांगितले.

एनआयएने हे प्रकरण चौकशीसाठी हाती घेतल्यानंतर वेगाने हालचाली होताना दिसत आहेत. येत्या एक-दोन दिवसात या सर्वांची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सचिन वाझे हे सीआययू (क्राईम इन्वेस्टिगेशन युनिट) मध्ये नियुक्त होते. हा विभाग मुंबई क्राईम ब्रांचच्या अंर्तगत येतो. त्यामुळे सचिन वाझे यांचे डिटेक्शन क्राईम ब्रांचचे उपायुक्त प्रकाश जाधव, जॉईंट पोलीस कमिश्नर मिलिंद भारंबे हे वरिष्ठ होते. त्यांना रिपोर्ट करणे सचिन वाझे यांना बंधनकारक होते. मात्र, सचिन वाझे हे डायरेक्ट पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या संपर्कात होते. यामुळे सचिन वाझे यांची कामाची कार्यपद्धती एनआयएच्या अधिकार्‍यांना जाणून घ्यायची आहे.

सचिन वाझे यांनी अनेक महत्त्वाच्या केसेसचा तपास केला आहे. टीआरपी केस, फेक फॉलोवर केस, डीसी कार केस आदी अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास केला आहे. या केसेस सचिन वाझे यांच्याकडे कशा गेल्या. त्या केसेस माहितीच्या आधारावर झाल्या आहेत की कशा प्रकारे झाल्या आहेत. सचिन वाझे यांच्याकडे केसेस कशा सोपवल्या जायच्या. जिलेटिन कार प्रकरण वाझे यांच्याकडे का देण्यात आले. त्याचा प्रमुख तपास अधिकारी म्हणून सचिन वाझेंना कुणी आणि का नेमले? प्रोसिजरने नेमले की इतर काही कारण होत, अशा अनेक मुद्यांवर मिलिंद भारंबे आणि इतर अधिकार्‍यांकडे चौकशी केली जाणार असल्याचे समजतेय.

आघाडी सरकारच्या मंत्र्यांची चौकशी?

अँटिलियाजवळ स्फोटके सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तकडाफडकी बदलीदेखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील एक-दोन मंत्र्यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मुंबई क्राईम ब्रांचचे जॉईंट कमिश्नर मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकार्‍यांना एनआयए माहिती घेण्यासाठी बोलावण्याची शक्यता आहे.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply