Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कोरोना काळात स्वतःपेक्षा जनतेची काळजी घेत त्यांना सर्वतोपरी व सढळ हस्ते मदत करणारे भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी (दि. 22) पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड-19 अर्थात कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला.
मागील वर्षात संपूर्ण जगात कोरोना या वैश्विक महामारीने थैमान घातले. त्यामुळे सगळीकडेच परिस्थिती गंभीर बनली. रोजंदारीवर जीवन असलेल्या अनेकांना उदरनिर्वाहाचे साधन गमाविण्याबरोबरच दोन वेळचे अन्न मिळणेही कठीण झाले होते. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे आलेल्या लॉकडाऊन परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी दानशूर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भाजपच्या वतीने मोदी भोजन कम्युनिटी किचन अर्थात मोफत अन्नछत्र उपलब्ध करून दिले. या मार्फत एक लाख 50 हजारांहून अधिक नागरिकांना भोजन देण्यात आले. त्याचबरोबर एक लाख 10 हजारांपेक्षा  अधिक नागरिकांना अन्नधान्य देऊन कोरोना संकटकाळात आधार देण्यात आला. याशिवाय एक लाखांहून अधिक नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणार्‍या गोळ्या, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर, परगावी जाण्यासाठी सुविधा अशी अनेक प्रकारची मदत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली मदत खर्‍या अर्थाने सर्वसामान्यांना आधार आणि समाजात प्रेरणा देणारी ठरली. अशा प्रकारे सतत सामाजिक बांधिलकी जपणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बसवराज लोहारे, आरोग्य अधिकारी श्री. गोसावी आदी उपस्थित होते.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply