Breaking News

मावळमध्ये बारणेंचा विजय निश्चित -अरुणशेठ भगत

पनवेल : रामप्रहर वृत्त

मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, रिपाइं आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नांदगाव, पळस्पे येथे रॅलीचं आयोजन गुरुवारी करण्यात आले होते.

या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत यांनी बारणे यांचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे. भाजप पूर्ण ताकदीनिशी बारणेंच्या पाठीमागे ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. तालुक्यातील नांदगाव, पळस्पे येथे प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेष ढवळे, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, चंद्रकांत भोईर, माजी सरपंच योगेश लहाने, रवि शेळके, अजय तेजे, सुनिल गावडी, प्रकाश चौधरी, विजय गवडी, महादेव नाईक, सपना वारके, संजय वारके, सचिन देशमुख, प्रमोद शेडे, भगवान कडवे, पळस्पे सदस्य रेखा डाममोदरे, अरुणा भोईर, विलास भगत, सुरज भोईर, शिवसेना कार्यकर्ते रघुनाथ पाटील, पनवेल ग्रामीण तालुका प्रमुख सुरज शेळके, सौैरभ भडसावळे, आनंद पाटील, कमलाकर ढोकल, मारुती म्हात्रे, विष्णू लहाने, संदिप पाटील, आशिष पाटील, विक्रम घरत, मिलिंद पवार, महेश पाटील, मंगेक कडपे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply