Monday , February 6 2023

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर

मुंबई ः विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी प्रवीण दरेकर यांची निवड झाली आहे. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पदासाठी भाजपचे आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांची नावे आघाडीवर होती, पण प्रवीण दरेकर यांनी भाजपच्या या दिग्गजांना मागे टाकत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवले. भाजपसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे. या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर यांचे नाव आघाडीवर होते, पण अखेरच्या क्षणी प्रवीण दरेकर यांनी बाजी मारली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते. अभ्यासू नेते अशी प्रवीण दरेकर यांची ओळख आहे. त्यांच्याकडे सहकारी क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव आहे.

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply