Breaking News

काजू बियांचा भाव घसरला; कोकणातील बागायतदार चिंताग्रस्त

महाड ः रामप्रहर वृत्त

हवामानात सातत्याने होणारे बदल, किडीचा प्रादुर्भाव यामुळे यंदा काजूचे उत्पन्न हवे तसे हाती आले नाही, त्यातच काजू बियांचा भाव घसरल्याने काजू बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत. कोकणातील मंडणगड, दापोली, लांजा, वेंगुर्ला,  सावंतवाडी, रत्नागिरी, महाड, पोलादपूर, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन परिसरात काजूची लागवड मोठ्या प्रमाणवर आहे. काही ठिकाणी वरकस जमिनीवरही काजू लागवड पहावयास मिळते, तर काही ठिकाणी नियोजनपुर्वक मेहनत घेवून काजूचे पीक घेतले जाते. त्यातून मिळणार्‍या उत्पन्नावर असंख्य शेतकर्‍यांची  उपजीविका चालत असते. काजूची ओली बी (कोवळी) मार्च ते एप्रिल या महिन्यात राखणदार न मिळाल्याने चोरीला जाते. उरलेली सुकलेली बी शेतकर्‍यांच्या हाती लागते. सुकलेली बी मजूर लावून गोळा करावी लागते. त्यानंतर कडक ऊन देवून ती विक्रीस दिली जाते. साधारण वेंगुर्ला सात आणि वेंगुर्ला चार या बीला चांगला भाव मिळतो. या वर्षी जिल्ह्यात पोची व वजनाला हलक्या बी चे उत्पन्न जास्त प्रमाणात हाती आले. या बिया खरेदीसाठी व्यापारी पुढे येत नाहीत. त्यामुळे काजूची सुकी बी पडून आहे. या बियांचा भाव अजूनही खाली येण्याची शक्यता आहे. अधिकारीवर्ग शासकीय मदतीपासून वंचित ठेवीत असल्यानेच ही वेळ येत असल्याचे काजू बागायतदार व शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply