Breaking News

उरणमधील कराटेपटूंचे जिल्हास्तरीय स्पर्धेत सुयश

उरण : प्रतिनिधी
कळंबोली येथील नवी मुंबई पोलीस आयुक्तालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सातव्या स्टुडंट ऑलम्पिक जुदो जिल्हास्तरीय स्पर्धा उत्तम प्रतिसादासह उत्साहात झाली. यामध्ये विविध वजनी गटांमध्ये गोशीन रियु कराटेच्या उरण तालुक्यातील, तसेच पनवेल तालुक्यातील केळवणे येथील खेळाडूंनी सुयश प्राप्त केले आहे.
स्पर्धेत तन्वी म्हात्रे, गायत्री म्हात्रे, आयुष पाटील, अर्णव पाटील, शुभम  ठाकूर, सिद्धेश ठाकूर, ओम पाटील, समीक्षा पाटील, रोहित घरत, अनिष  पाटील, आर्वी केदारी, काव्य म्हात्रे, विनया पाटील, अमिता घरत, अमिषा  घरत, अमर  घरत, आयुष पाटील, स्वजल पाटील, श्रावणी म्हात्रे, श्रुती पाटील, अंश म्हात्रे यांनी सुवर्णपदक, अभिज्ञा पाटील, श्लोक  ठाकूर, यश पाटील, कक्षा म्हात्रे, ऋतुराज  माळी, क्रांती ठाकूर यांनी रौप्यपदक, तर अथर्व गाताडी, सिद्धेश ठाकूर, यश मोकल, करण पाटील यांनी कांस्यपदक पटकाविले.
टीमने एकूण 21 सुवर्ण, सहा रौप्य, चार कांस्य अशी 31 पदके जिंकली. या खेळाडूंची सोलापूर येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्टुडंट ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी उमेदवारांना सिहान राजू कोळी, गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे, तसेच पंच महेंद्र कोळी, राजेश कोळी, संतोष मोकल यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धा यालकर, जयेश चोगले यांनी आयोजित केली होती. विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply