उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हा उरण, नवी मुंबई येथील भारतातील सर्वात मोठे कंटेनर हाताळणीचे बंदर आहे. या बंदरामध्ये गेल्या मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21च्या आर्थिक वर्षात सर्वाधिक कंटेनची हाताळणी केली आहे. यामध्ये 7.7 दशलक्ष टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) ची हाताळणी केली.
टीईयू (ट्वेन्टी फून इक्वॅलेन्ट युनिट्स) हे एक कंटेनरच्या मोजमापाच्या अंदाजे एकक म्हणून ओळखले जाते. कंटेनच्या हातळणीसंदर्भातील मोजण्याचे हे एकक कंटेनरच्या परिमाणांवर आधारित असते.
जेएनपीटीने मागील आर्थिक वर्ष 2020च्या 5.03 दशलक्ष टीईयूच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021मध्ये 7.7 दशलक्ष टीईयू (वीस फूट समकक्ष युनिट्स) ची हाताळणी केली. जेएनपीटीने आर्थिक वर्ष 2019-20च्या 68.45 टीईयूच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21मध्ये एकूण 64.81 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली आहे.
जेएनपीटीमध्ये मार्च माहिन्यात एकूण 5,27,792 टीईयू कंटेनर वाहतुकीची हाताळणी केली गेली जी एका महिन्यात केली गेलेली ही आजवरची सर्वाधिक कंटेनर वाहतुक हाताळणी आहे. जेएनपीटीने मार्च 2020मधील 5.93 दशलक्ष टन्सच्या तुलनेत मार्च 2021 महिन्यात एकूण 7.33 दशलक्ष टन वाहतुकीची हाताळणी केली जी मागील वर्षाच्या याच महिन्याच्या वाहतुकीच्या तुलनेत 25.30 टक्के अधिक आहे.
जेएनपीटीमध्ये पाच कंटेनर टर्मिनल आहेत. टर्मिनलनिहाय आकडेवारीचा आढावा घेतला असता एपीएम टर्मिनल मुंबई (जीटीआय) मध्ये 1.66 दशलक्ष टीईयू, डीपी वर्ल्ड एनएसआयजीटी मध्ये 0.78 दशलक्ष टीईयू, डीपी वर्ल्ड एनएसआयसीटीमध्ये 0.75 दशलक्ष टीईयू आणि जेएनपीटीच्या स्वत:च्या मालकीच्या टर्मिनलमध्ये 0.54 दशलक्ष टीईयूची हाताळणी केली गेली. आर्थिक वर्ष 2021मध्ये नव्याने विकसित झालेल्या बीएमसीटीने सुमारे 0.93 दशलक्ष टीईयू हाताळले. एनएसआयसीटी आणि बीएमसीटीपीएलने माल हाताळणीमध्ये आथिर्क वर्ष 2020-21मध्ये अनुक्रमे 41.33 आणि 15.36 टक्के वाढ नोंदविली आहे.
जेएनपीटीमधील बीपीसीएल लिक्विड कार्गो टर्मिनलने आर्थिक वर्ष 2019-20मधील 57 जहाजांमधून हाताळणी केलेल्या 0.85 दशलक्ष टनांच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21मध्ये 70 जहाजांमधुन 1.04 दशलक्ष टन एलपीजी हाताळला आहे.
जेएनपीटीने बीएमसीटी टर्मिनलला जेएनपीटीच्या इतर चार कंटेनर टर्मिनल्सला जोडणारा नवीन इंटर टर्मिनल मार्ग सुरू करून एक मोठे पाऊल उचलले. तसेच रेल्वेने मेहसाणा (गुजरात) ते जेएनपीटीपर्यंत पर्यंत डबल स्टॅकड़ ड्वार्फ कंटेनर ट्रेनची यशस्वी चाचणी घेतली. जेएनपीटीला भारतातील पहिले बंदर आधारित विशेष आर्थिक क्षेत्र जेएनपीटी-सेझ सुरू करण्याचा मान प्राप्त झाला आहे. तसेच, किनारपट्टीवरील तब्बल अडीच दशलक्ष टन द्रव मालवाहतुकीची क्षमता असलेल्या कोस्टल बर्थचे बांधकामसुद्धा पूर्ण केले आहे.
-संजय सेठी, अध्यक्ष, जेएनपीटी
RamPrahar – The Panvel Daily Paper