
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाचा 41वा स्थापना दिवस मंगळवारी (दि. 6) पनवेल तालुका व शहरी भागात उत्साहात साजरा झाला. यानिमित्त भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भारतमाता, तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महापालिका स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, नगरसेवक मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, शिवाजी भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी भारतमाता आणि ज्येष्ठ नेत्यांना अभिवादन केले. दरम्यान, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षाचा झेंडा आपापल्या निवासस्थानी लावून स्थापना दिन साजरा केला.