व्यापार्यांचा नाराजीचा सूर, बाजारपेठेत तुरळक गर्दी
रोहे ः प्रतिनिधी
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याचे पालन रोहा बाजारपेठेत होत असताना, प्रशासनाकडून मंगळवारी दुपारपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य दुकाने बंद करण्यात आली. बुधवारीही शहरासह ग्रामीण भागातही दुकाने बंद करण्यात आली, त्यामुळे व्यापार्यांत नाराजीचा सूर आहे.
रोहा शहरातील बाजारपेठेतील अत्यवश्यक सेवेतील दुकाने वगळून अन्य सर्व दुकाने मंगळवारी दुपारपासून बंद करण्यात आली आहेत. मेडीकल स्टोअर्स, दवाखाने, खाद्यपदार्थांची दुकाने, किराना माल, दुध, बेकरी, भाजीपाला यासह अन्य अत्यवश्यक सेवेतील दुकाने चालू आहेत. तर ज्वेलर्स, कापड, इलेक्ट्र्रीक, इलेट्रॉनिक, कटलरी, झेरॉक्स सेेंटर, शोरूम, गॅरेज यासह अन्य दुकाने बंद करण्यात आली आहेत. बुधवारीही सर्व दुकाने बंद होती. त्याबाबत व्यावसायिकांतून नाराजी दिसून आली. त्यामुळे बाजारपेठेत नेहमी प्रमाणे गर्दी नव्हती. रोहा एसटी बस स्थानकातही शुकशुकाट होता. शहरात पोलिसांची गस्त सुरू होती.