अलिबाग : जिमाका
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रविवारी (दि. 11) जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन केले.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, तहसिलदार सतीश कदम तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुरोगामी महाराष्ट्रात समतेचा संदेश समाजाला दिला. त्याचप्रमाणे शिक्षणावर भर देऊन सर्वसामान्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.