Breaking News

चढ्या भावाने वस्तूंची विक्री कराल तर खबरदार!; सुधागड पाली तहसीलदारांची व्यापार्यांना सूचना

पाली : रामप्रहर वृत्त

लॉकडाऊनच्या धास्तीने सुधागड तालुक्यातील जनता जीवनावश्यक व गरजेच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात धाव घेत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन काही व्यापारी चढ्या भावाने वस्तूंची विक्री आहेत. हे रोखण्यासाठी सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी व्यापार्‍यांना दर्शनी भागात दरपत्रक लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी व्यापार्‍यांना व तेथील कामगारांना लसीकरण व आरटीपीसीआर टेस्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सुधागड तालुक्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. राज्य सरकार कडक लॉकडाऊन करणार असल्याच्या धास्तीने नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी तालुक्यातील पाली, परळी, पेडली आदी बाजारपेठांमध्ये गर्दी करत आहेत.  याचा फायदा काही व्यापारी, दुकानदार घेतांना दिसत आहेत. बाजार भावापेक्षा जास्त दराने वस्तूंची विक्री दुकानदार करत आहेत. या पार्श्वभूमीवर सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी परिपत्रक काढून काही सूचना व आवाहन केले आहे. त्यामध्ये सुधागड तालुक्यातील व्यापारी व दुकानदारांनी ठळक अक्षरात दर्शनीय ठिकाणी वस्तूचे दरपत्रक लावावे. 45 वर्षे पूर्ण असलेल्या व्यापारी व दुकानदारांनी कोरोना लसीकरण करून घेणे बंधनकारक आहे आणि 45 वर्षाखालील दुकानदारांनी व तेथील कामगारांनी आरटीपिसिआर टेस्ट करून घेणे आणि सामाजिक अंतर राखून खरेदी विक्री करणे बंधनकारक राहील, असे परिपत्रकात नमूद केले आहे. या नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. असे तहसीलदार रायण्णावार यांनी सांगितले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply