Breaking News

कोव्हॅक्सिन निर्मितीस ‘हाफकिन’ला परवानगी

राज ठाकरेंनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मुंबई ः प्रतिनिधी
मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भारत बायोटेक कंपनीकडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या व लसीचा तुटवडा याबाबत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी प्रामुख्याने पाच मागण्या केल्या होत्या, तसेच लसींचा पुरवठा वेळेत होण्यासाठी हाफकिन व हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक व अन्य संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणीही होती. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज यांना पंतप्रधानांना उद्देशून एक ट्विट केले आहे.
100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या विनंतीला आपण मान्यता दिलीत. याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार, असे राज यांनी म्हटले आहे, तसेच केंद्र सरकारकडून असेच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करू हे नक्की, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply